10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब :- “तुम्ही तुमच्या मुलाला टॅब घेऊन देऊ शकलात नाही, पण सरकार देणार आहे! आणि तेही मोफत!” होय, ही बातमी खरंच आहे आणि अनेक गरीब कुटुंबांसाठी ती एक आशेचा किरण घेऊन आली आहे.
महाराष्ट्र शासनाने 2025 साली जाहीर केलेली Mahajyoti Tab Yojana (MTY) ही योजना आता अधिकृतपणे सुरू झाली आहे आणि यामध्ये 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब (10th pass students will get free tabs) ही मोठी संधी आहे. चला तर मग जाणून घेऊया, या योजनेचा संपूर्ण तपशील.
योजना काय आहे आणि कोणासाठी आहे?
Mahajyoti Tab Yojana 2025 ही महाराष्ट्र शासनाच्या मागासवर्गीय विभागांतर्गत सुरू करण्यात आलेली एक विशेष योजना आहे. यामध्ये मुख्यतः OBC, NT, VJ, आणि SBC प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांना टार्गेट करण्यात आलं आहे.
ही योजना केवळ टॅबलेट वाटपावर थांबत नाही, तर त्यात विद्यार्थ्यांना 6 GB मोफत डेटा दर महिन्याला आणि 2025 ते 2027 दरम्यान स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन मार्गदर्शन दिलं जाणार आहे. म्हणजेच, 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब या मागे फक्त टॅब नव्हे तर शिक्षणासाठी मोठा आधार मिळणार आहे.
कोण पात्र आहे? – हे तपासा आधी!
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही ठराविक अटी आहेत. खाली दिलेल्या अटी पूर्ण करणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील:
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.(Maharashtriyan)
- तो OBC, NT, VJ, किंवा SBC प्रवर्गातला असावा.
- 2025 मध्ये दहावी उत्तीर्ण केलेली असावी.
- सध्या 11वीत विज्ञान शाखेत शिक्षण घेत असावा.(Chosed Science Stream)
- पालकांचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असावे.
- नॉन-क्रीमिनल सर्टिफिकेट आवश्यक (२ वर्षांपेक्षा जुना नसावा).
काय मिळणार आहे या योजनेअंतर्गत?
या योजनेंतर्गत मिळणाऱ्या सुविधा खूप उपयोगी आहेत:
- मोफत टॅबलेट – उच्च दर्जाचा टॅब, जो अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त असेल.
- दरमहा 6GB डेटा – सतत ऑनलाईन शिक्षणासाठी मदत.(6 GB Data Get Free)
- NEET, JEE, CET, CAT यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन कोचिंग.
हे सगळं मिळवणं म्हणजे एका गरीब विद्यार्थ्याला स्वप्नातसुद्धा वाटलं नसेल इतकी मोठी संधी!
अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रं
जर तुम्ही पात्र असाल, तर अर्ज करताना खालील कागदपत्रं तयार ठेवा:
- आधार कार्ड (दोन्ही बाजू)
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला (Cast Cetrificate)
- नॉन-क्रीमिनल सर्टिफिकेट
- 10वीची मार्कशीट(10th Mark Sheet)
- 11वी प्रवेशाचे प्रमाणपत्र (11th TC )
हे सर्व दस्तऐवज स्कॅन करून ठेवावेत कारण अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारला जाणार आहे.
कुठे आणि कधी करायचा अर्ज?
अर्ज Mahajyoti च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन भरावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2025 आहे. त्यामुळे जास्त वेळ न दवडता लगेच अर्ज करणे योग्य ठरेल.
हे लक्षात ठेवा, 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब ही योजना फक्त मर्यादित कालावधीसाठी आहे. एकदा संधी हातून गेली, की पुन्हा संधी मिळेलच असं नाही.(Hurry Up)
या योजनेचे महत्त्व आणि फायदे (Advantages Of This Scheme)
आजच्या काळात शिक्षण हे पूर्णपणे डिजिटल होत चालले आहे. अनेक गरीब विद्यार्थी केवळ स्मार्टफोन किंवा टॅब नसल्यामुळे मागे पडतात. अशा वेळी ही योजना त्यांच्यासाठी एक वरदानच आहे.
- महागड्या कोचिंगशिवाय अभ्यासाची संधी
- वेळ आणि प्रवास वाचतो
- घरबसल्या गुणवत्तेचं शिक्षण
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठी मोठा दिलासा
10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब ही योजना त्यांच्या भविष्याला नवीन दिशा देऊ शकते.
महाज्योती टॅब योजना (MTY) ही केवळ टॅब वाटप योजना नाही, तर ती एक डिजिटल शिक्षणाची क्रांती आहे. ज्यांना शिक्षणाची इच्छा आहे पण साधनं नाहीत, त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतले कोणी या अटींमध्ये बसत असतील, तर आजच अर्ज करा. वेळ न घालवता ही संधी उचलणं गरजेचं आहे.
लवकर अर्ज करा – संधी मर्यादित आहे!
तुमच्या मुलाचं भविष्य उजळवायचं आहे का? तर ही योजना गमावू नका. 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब ही योजना शिक्षणाच्या दारात असलेली सुवर्णसंधी आहे – लवकर अर्ज करा आणि या योजनाचा फायदा घ्या!
अजून एक महत्वाची बातमी :- पीएम किसान हफ्त्याची तारीख जाहीर: तुमचं नाव यादीत आहे का ?